Gautami Patil Dance : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे. राज्यात कुठेही गौतमी पाटीलच्या डान्सचा (Gautami Patil) कार्यक्रम असला की तरुणाईची बेफाम गर्दी ही आलीच. गौतमी पाटीलच्या आदकारीवर महाराष्ट्रातील तरुणाई बेधुंद होऊन थरकताना दिसतेय. पण अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ होताना दिसतो. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय. पुण्याच्या वेल्हा तालुक्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला. तरुणांना आवरण्यात पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. अखेर हा कार्यक्रम आवरता घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाईचा धिंगाणा
वेल्हा तालुक्यातील (Pune Velha) विंझर गावात मनसे जिल्हाअध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसंच खासगी बॉडिगार्डही ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाला तरुणाईची तुफान गर्दी झाली आणि गौतमी पाटील स्टेजवर येताच तरुणाई बेफाम झाली. तरुणांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन नायाचला सुरुवात केली. शेवटी धिंगाणा वाढत गेला. गर्दी आवरताना वेल्हा पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. पोलिसांना सौम्यय लाठिचार्जही करावा लागला. पण यानंतरही गर्दी आवरत नसल्याने अखेर आयोजकांना कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.


आर्थिक परिस्थितीमुळे डान्स
गौतमीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. अकलूज लावणी महोत्सवात (Lavani Mahotsav) तिने पहिल्यांदाच लावणी केली. त्यावेळी तिला 500 रुपये मिळाले होते. त्यानंतर गौतमी कधी पुणे तर कधी कोल्हापूर...इथे तिचे लावणीचे फड रंगायला लागले. तिचे आज राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम होतात. आज तिला कार्यक्रमासाठी लाखो रुपये मिळतात.


गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमादरम्यान कोणीतरी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ (gautami patil news) काढला. एवढंच नाही तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. या व्हिडिओमुळे गौतमीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. याप्रकरणी तक्रारही दाखल झाली.


 विरोधकांच्या यादीत इंदुरीकर महाराजांचे नाव
आक्षेपार्ह डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते. ही गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ येते. गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे. 


कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र, तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात...तीनच गाणी पण शिट्ट्या किती? असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी थेट गौतमी पाटील किती मानधन घेते हेच सांगितलं होतं.