Gautami Patil VS Ghanshyam Darade : छोटा पुढारी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडे याने पुन्हा डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर निशाणा साधला आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) याने गौतमी पाटीलला इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर गौतमी पाटीने घनश्याम दराडेला प्रत्युत्तर दिलं आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम करतेय, असे गौतमी पाटीने म्हटलं आहे. यामुळे आता घनश्याम दराडे विरुद्ध गौतमी पाटील असा वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार (Bihar) करू नका, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, असा इशारा घनश्याम दराडेने गौतमी पाटील हिला दिला होता. आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करत असल्याचा आरोप केला यावरच आता गौतमीने प्रत्युत्तर दिलं आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी घनश्याम दराडे आला असताना त्याने याबाबत भाष्य केले होते.


"मी अस काय केलं आहे की मी महाराष्ट्राचा बिहार केला? असं ते लोक बोलत आहेत, मी चांगल्या पद्धतीने नृत्य सादर करत आहे. हा आरोप चुकीचा आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी सोडून पुढं जाते. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?" असा सवाल गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना केला.


दुसरीकडे, गौतमीच्या नाशिकच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले होते. त्याबाबतही गौतमीने भाष्य केले. पत्रकारांना धक्काबुक्की होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असे गौतमीने म्हटलं आहे.


याआधीही केले होते आवाहन....


"गौतमी ताईंना नम्रतेची विनंती करतो की लावणी महाराष्ट्राची संस्कृती असून तुम्ही ती चांगल्या प्रकारे करताय. पण तिला दुसरीकडे नेऊ नका. कला कलेच्या जागेवर राहू द्या. फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय, सुटताय. चुकीचे कृत्य करु नका. फेमस व्हा पण तुमच्या कलेतून व्हा. महाराष्ट्राचा बिहार करु नका. जो महाराष्ट्राच बिहार करेल त्याच्या चुकीला माफी नसणार आहे. सगळ्या तरुणांना मी हात पाय जोडून सांगतो राजे बाई नाचवणारे नव्हते तर बाई वाचवणारे होते. संस्कृतीला तडा जाता कामा नये. वेगळ्या पद्धतीची लावणी तुम्ही ठेऊ नका. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा जीव जातोय. पोलिसांचे नाहक हाल होत आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लावणी करु नका," असे आवाहन घनश्याम दराडेने केले होते.


गौतमीच्या नृत्यासाठी पोलिसांकडे भरले पाच लाख रुपये


गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरण ठरलेलं आहे. या गर्दीला आवर घालणे पोलिसांमोर एक कठिण काम असते. मात्र सांगोला मधील पठ्य्याने गोंधळ होऊ नये म्हणून फक्त पोलीस बंदोबस्तासाठी पाच लाख शुल्क भरले आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी गावात राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस आबा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील आली होती. तरुणाईची गर्दी अनेक ठिकाणी होणारी हुल्लड बाजी पाहता गोंधळ होतोच. यासाठी पोलिसांची गरज लागणार होती. पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम कोणत्याही गोंधळाशिवाय पार पाडवा यासाठी आबा मोटे यांनी 106 पोलिसांचा फौजफाटा घेरडी मध्ये बोलवला होता. एवढा मोठा बंदोबस्त घेण्यासाठी त्यांना तब्बल पाच लाख रुपये शुल्क भरावे लागले