Gautami Patil On Indurikar Maharaj : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) यांनी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)  हिच्यावर निशाणा साधला होता.  इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील कार्यक्रमासाठी घेत असलेल्या मानधनाबाबत भाष्य केले होते. मी तर इंदुरीकर महाराजांची फॅन आहे असं म्हणत  गौतमी पाटीलने डायरेक्ट विषयच संपवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आक्षेपार्ह डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत आली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते. ही गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ येते. गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे.


इंदुरीकर महाराज गौतमी बद्दल काय म्हणाले होते?


बीडनंतर आणि शिर्डीमध्ये किर्तनाच्या कार्यक्रमा दरम्यान  इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र, तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात...तीनच गाणी पण शिट्ट्या किती? असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी थेट गौतमी पाटील किती मानधन घेते यावर भाष्य केले. 


मी इंदुरीकर महाराजांची फॅन आहे, मात्र ते म्हणतात त्याप्रमाणे तीन गाण्यांचे तीन लाख रूपये मानधन घेत नाही, असं उत्तर गौतमी पाटीलनं दिलंय. गौतमी पाटीलला 3 गाण्यासाठी तीन लाख मिळतात मात्र किर्तन करून आम्हाला काहीही मिळत नाही अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली होती. गौतमी पाटीलनं मात्र त्यांच्या टीकेलं उत्तर देणं टाळलंय. गाडा आला आणि घाटात राडा झाला...असे म्हणत, थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचं म्हणत इंदुरीकर महाराजांनी गौतमीच्या डान्स स्टेपवर अप्रत्यक्षरित्या भाष्य केले होते.  


इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया


मी इंदुरीकर महाराजांची फॅन आहे, मात्र ते म्हणतात त्याप्रमाणे तीन गाण्यांचे तीन लाख रूपये मानधन घेत नाही, असं उत्तर गौतमी पाटीलनं दिले. गौतमी पाटीलला 3 गाण्यासाठी तीन लाख मिळतात मात्र किर्तन करून आम्हाला काहीही मिळत नाही अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली होती. गौतमी पाटीलनं मात्र त्यांच्या टीकेलं उत्तर देणं टाळले.  माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटीलचा कार्यक्रमक आयोजीत करण्यात आला होता. महाराजांवरही प्रेक्षक तेवढंच प्रेम करतात अस म्हणत गौतमीने त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.