Maharashtra Politics :  महायुतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि अजित पवार गटात कलगीतुरा रंगल्याचे अनेकदा पहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार गट सोबत नको अशी जाहीर मागणी केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.  भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खदखद बोलून दाखवली. 


अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको.  पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या मानगुटीवर बसलेत अशी जहरी टीका देखील भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. 


चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका


मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.. त्यांचा रोख पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा आहे. अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं, उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असा पलटवार अमोल मिटकरींनी केलाय.


महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती, त्याला प्रवीण दरेकर यांनी  प्रत्युत्तर देत मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.


विधानपरिषदेत 11 पैकी किमान एक जागा पूर्व विदर्भाला द्यावी, अशी मागणी अजित पवार गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केलीय. येणा-या काळात पक्ष संघटना वाढवायची असेल तर संविधानिक पद हे पूर्व विदर्भाला दिलं पाहिजे, असं गुजर यांनी सांगितलंय. तसंच मी स्वत: विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.