कोकण : रायगड जिल्ह्यातील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल असे ८० दिवस घाट बंद राहणार आहे. त्यामुळे भोर ते महाड अशी वाहतूक बंद असेल. पावसाळ्यात घाटात सातत्याने दरडी कोसळतात. तसंच रस्त्याचाही काही भाग नादुरूस्त झाला आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी घाटरस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सावित्री नदी दुर्घटनेनंतर आंबेत पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं जात आहे.


प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आलीय. हा पूल बंद केल्यामुळे दापोली, मंडणगड, वेळास, बाणकोट, आंजर्ले, मुरूड, दाभोळ  इथे जाणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना डोकेदुखी होणार आहे.