Ghatkopar Hoarding Collapse : वादळाचा आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका मुंबईला बसला आहे. जोरदार वा-यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्या आहेत. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.  67 जण जखमी झाले आहेत. 100 हून अधिक लोकं होर्डिंगखाली अडकले होते. . NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तातडीने बचाव कार्य सुरु आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जोरदार वा-यांमुळं घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडलीय. घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई नंगर परिसरात भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. या घटनेत तब्बल 35 जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगखाली 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, हे होर्डिंग बेकायदा होतं. ते उभारणा-याला अटक करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे.


घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग्ज अनधिकृत?


घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जात आहे.  पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता.  पालिका केवळ  40 फूट × 40 फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग  120 फूट × 120 फुटांचे होते.  इगो मिडिया कंपनीने होर्डिंग उभारले होते.  रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग होते. रेल्वे पोलिसांनी यासाठी परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.  संबंधित जागेवर असलेल्या झाडांवर विषप्रयोग केल्याप्रकरणीही जाहीरात कंपनीवर पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. 


घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटने प्ररकरणी इगो अॅडव्हर्टायझिंग कंपनी आणि रेल्वेविरोधात बीएमसी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. तर, होर्डिंगची जागा रेल्वेची नसल्याचे  रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  


मृतांच्या नातेवाईंकाना 5 लाखांची मदत 


दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊ पाहणी केली... त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यत्र्यांनी जाहीर केलीये... 


वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळला


मुंबईत वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वडाळा येथील इमारतीचा दहा मजली कार पार्किंग लोखंडी टॅावर कोसळला आहे. या दुर्घटनेत 12 ते 13 वाहनांचे नुकसान झाले. तर एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. या अपघातात एक लहान मुलगा थोडक्यात बचावला आहे. NDRFची टीम घटनास्थळी पोहोचलीये आणि हा लोखंडी टॉवर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 


पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात


मुंबईमध्ये पावसामुळे दुर्घटना घडल्या आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. नवी मुंबई महानगरपालिकेची बस आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यात एक महिला जखमी झाली असून अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत..