वाल्मिक जोशी, जळगाव : 'गिरीश महाजनांमध्ये समोरून सरळ सामना करण्याची ताकद नाही. मला वेगवेगळ्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न हा आजचा नाही, पूर्वीपासून सुरू आहे. झोटिंग, अँटी करप्शन विविध माध्यमातून चौकशी झाल्या कुठलाही तथ्य समोर नाही. आता ईडी याची चौकशी करतंय. त्यातही एकाच प्रकरणाच्या वारंवार चौकशा केल्या जात आहे. माझ्यावरील षडयंत्र राजकीय आकसापोटी, राजकीय सूड सुरू आहे.' असे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'लंडनमध्ये माझ्या जावयाकडे स्वतः गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस घरी राहून जेवण केलं त्यांचं मीठ खाल्लं आणि त्यांना ईडीमध्ये अडकून उपकार केले. काहीतरी शोधा आणि नाथाभाऊंना तुरुंगात टाका, हा एकमेव हेतू यांचा सुरू आहे.'


एकनाथ खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावं लागेल, असे विधान भाजपनेते गिरीश महाजन यांनी केल्यानंतर एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि महाजन यांच्यावर टीका केली.