नाशिक : मुख्यमंत्र्याचे संकटमोचक असं ज्यांना म्हटलं जात होतं, त्या गिरीश महाजनांवर आता त्यांच्या जिल्ह्यातही विरोधकांकडून टीका होत आहे. अर्थातच निवडणुकीचं घोडामैदान जवळ आल्याने आता हे अधिक वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांनी केलेलं वशीकरणाचं विधान बालिश आहे, त्यांनी आपल्या वडलांचं नाव न लावण्याची तयारी करावी, असं प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे एरंडोलचे आमदार डॉ. सतीश पाटलांनी दिलंय. सतीश पाटील यांनी महाजनांनी वशीकरणाचा मंत्र शिकून मुख्यमंत्र्यांना वश केल्याची टीका शुक्रवारी जळगावात केली होती.


तसेच निवडून आलो नाही तर वडलांचं नाव लावणार नाही, असं आव्हान ही दिलं होतं. १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असल्यानं सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले होते, त्यावेळी त्यांनी सतिश पाटलांना प्रत्युत्तर दिलंय.



गिरीश महाजन जागावाटपाच्या चर्चेत नाहीत - उद्धव ठाकरे


मुंबईत दुसरीकडे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते गिरीश महाजन या नेत्यांमध्ये मात्र जागावाटपावरून कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळतंय. 


दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ५०-५० टक्के जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं असलं, तरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हा दावा फेटाळलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र महाजन या चर्चेत नसल्यानं त्यांनी बोलू नये, असं सूचक विधान केल्यामुळे युतीत नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली आहे.