COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल करोळे, औरंगाबाद : एका १४ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कारण जास्त धक्कादायक आहे. आत्महत्या करण्याआधी दोन दिवस ती सतत मोबाईलवर आत्महत्येचे व्हिडीओ पाहात होती. त्यामुळे त्यावरुन आई-बाबा रागावले. त्याच रागातून तिनं आत्महत्या केल्याचा संशय आहे. या मुलीला मोबाईलचं प्रचंड वेड होतं. असं देखील समोर आलं आहे.


मुलं मोबाईलवर काही भलतं-सलतं पाहात नाहीत ना ?


भारतात तरुणांच्या आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या तीन वर्षांत 30 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. भारतात मुलांच्या आत्महत्यांमध्ये गेल्या काही वर्षांत साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी पालकांची चिंता वाढवणारी आहे. 


मुलं सध्या प्रचंड मोबाईल वेडी झालीयत. त्याचबरोबर लहान मुलांना रागही लवकर येतो आणि टोकाचं पाऊल उचललं जातंय. मुलांकडे लक्ष तर ठेवाच पण त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य संस्कार होतायत ना, याकडेही लक्ष द्या.


व्हिडिओ : पाहा स्पेशल रिपोर्ट