नाशिक : नाशिकमध्ये आठ दिवसात तिसरा खून झाल्यानं शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी एकलहऱ्या भागात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटलीय. खाजगी क्लासमध्ये समुपदेशनाचं काम करणार हर्षदा आहिरेचा हा मृतदेह असल्याचं समोर आलंय.


हर्षदाचा खून करून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचं तपासात पुढे येतंय. प्रेमप्रकरणातून फूस लावून खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.


दरम्यान, गेल्या आठ दिवसात नाशिक रोड परिसरातला हा तिसरा खून आहे.