अनिरूद्ध ढवळे, झी मीडिया, अमरावती : आपल्या आई वडील व आजी आजोबा सोबत मावशी कडे दिवाळीचा फराळ घेऊन बैलगाडी ने जात असताना एका चिमुकलीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेळघाटातील बुलोरी या गावात घडली अस्मिता छगन भिलोवेकर वय १६ असे म्रुत्युमुखी  पडलेल्या तरूणीचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारणी तालुक्यातील भुलोरी गावातील अस्मिता छगन भिलावेकर वय 16 वर्षे ही शासकीय कन्या आश्रम शाळा टेम्बुंसोडा येथे नवव्या वर्गात शिकते. दिवाळी निमित्त अस्मिता ही आपले आई बाबा आजी आजोबा सह बैलगाडीने फराळाचे पदार्थ घेऊन मावशीला भेटण्यासाठी निघाली वाटेत अचानक अस्मिता ची ओढणी बैलगाडीच्या चाकात जावून अडकली आणि तिच्या गळ्याला फास लागला गळ्याभोवती ओढणी अडकल्याने तिला गुदमरु लागले. अचानक पणे घडलेल्या या प्रसंगाने इकडे आई वडील व आजी आजोबा जिवाच्या आकांताने तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते मात्र अखेरपर्यंत ओढणी तिच्या गळ्यातून निघाली नाही आणि क्षणातच तिचा मृत्यू झाला.


स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही दळणवळणाच्या सोयी नाही


मेळघाट आदिवासीबहुल भागात स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही मेळघाटातील अनेक छोट्या गावांमध्ये दळणवळणाची कुठली साधने नाही त्यामुळे आजही तेथील आदिवासी समाज हा जीव मुठीत धरून जंगलातून प्रवास करतो. अनेक गावात वाहतुकीची सोय नसल्यामुळे तेथील लोक बैलगाडीने या गावातून दुसऱ्या गावातून ये-जा करत असतात अशातूनच अस्मिता ही सुद्धा आपल्या आई-वडिलांसोबत मावशीकडे बैलगाडीतून जात होती अशातच तिचा ओढणी अडकुन दुर्दैवी मृत्यू झाला.