Akola Crime News : मैत्रीचं नातं हे सर्वात खास नातं मानलं जात. याच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ओकोल्यात घडली आहे. वाढदिवसादिवशीच जिवलग मैत्रिणीने धोका दिला आहे. मैत्रिणीच्या मित्रांनी सामहिक बलात्कार केला आहे. यामुळे एका रात्रीत तरुणीचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अतिप्रसंग झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलिस हद्दीत घडली आहे.  या प्रकरणात एका मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले आहे. अल्पवयीन पिढीत मुलगी हे दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यात होती.


यादरम्यान तिची मैत्री आरोपी युवती सोबत झाली आणि आरोपी युतीने पीडित मुलीची मैत्री आपल्या तीन मित्रांसोबत करून दिली. पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलवण्यात आले. यानंतर या आरोपींनी शीतपेयच्या नावाने तिला दारू पाजली. यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अतिप्रसंग केला.


आरोपी युवती आणि तिच्या साथीदाराने याचा व्हिडिओ बनवला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी दिली. यानंतर  पीडित मुलीला वारंवार फोन करून वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पीडित मुलीने जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जुने शहर पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून यातील आरोपी युवतीला अटक केली आहे.  तर फरार तिन्ही आरोपींचा पोलीस शोध  घेत आहेत.


नवी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये स्वच्छकतागृहात छुपा कॅमेरा


नवी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये स्वच्छकतागृहात छुपा कॅमे-याने चित्रीकरणाचा प्रकार उघड झालाय.  वाशीतील विशियस सर्कल या हॉटेलमध्ये महिला स्वच्छतागृहात हॉटेल कर्मचाऱ्याने मोबाईल फोन ठेवून चित्रीकरणाचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. महिला ग्राहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर याप्रकरणी हॉटेल कर्मचारी अजय सिंहला अटक करण्यात आलीय. चित्रीकरणासाठी ठेवलेला मोबाईलही ताब्यात घेण्यात आलाय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.