Big Breaking : महाराष्ट्रात पुन्हा खळबळ; चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार केला आणि...
महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला आहे.
Chandrapur Crime News : बदलापूर येथील शालेय विद्यार्थीनींच्या अत्याचार प्रकरामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच आता आणखी एका घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. तर, सिंदखेड राजा तालुक्यात एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला. 12 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा आरोपीच्या सहका-यांनी व्हिडीओ काढला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागभीड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली. सोबतच आरोपीना कठोर शिक्षेची मागणी करत दबाव वाढविला.
पोलिसांनी व्हिडीओची तपासणी करून विविध पथके गठीत करत मुलीचा मग काढला. सोबतच घटनेत सामील सर्व 5 आरोपींना 3 तासात ताब्यात घेतले. राज्यभर महिला विरोधातील गुन्ह्याच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागभीड येथे दाखल झाले. या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. सोबतच हा कथित व्हिडीओ कुणालाही पाठवू नका, कारवाई ओढवून घेऊ नका अशी ताकीद दिली आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील वर्डदी येथील जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या वर्गातील विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आला आहे . किनगाव राजा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम शिक्षक खुशाल उगले ला शोधण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय. पीडित मुलगी ही 10 वर्षांची असून ती मामाकडे राहायला होती.. महिभरापूर्वी आईवडील नसताना आरोपीनं तीच्यावर लैंगिक अत्याचार केला.. त्यानतंर बदनामीची धमकी देत तो तीचं लैंगिक शोषण करत होता.. अखेर पीडित मुलीनं वडिलांना सांगीतल्यानंतर वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.. पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी युवराज गवळी याच्यावर गुन्हा दाखल केला.. आणि त्याला अटक केलीये. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.