नाशिक​ : नाशिकच्या वसंत पवार मेडिकल कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात शिकत असलेल्या स्वप्नील शिंदे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. मुलाच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॉलेजमधील मुली त्याची नेहमी  रॅगिंग करत असत या त्रासाला कंटाळून स्वप्नील ने याअगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता. कॉलेजमधील त्रास थांबत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र कॉलेज प्रशासनने आत्महत्या नसून तो चक्कर येऊन पडला असल्याचं म्हटलंय.  दरम्यान त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणला आहे. गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय.


 नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा ( doctor) संशयास्पद मृत्यु (death) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असे या डॉक्टरचे नाव असून तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्यात वर्षात शिक्षण घेत होता. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये (suicide) त्याने रॅगिंग करणार्यांघची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.


मुलींच्या रॅगिंगचा बळी?


सुत्रांच्या माहितीनुसार कॉलेजमधील काही मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या. त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणाऱ्यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीसांकडून याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


रॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे


आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


स्वप्नील महारु शिंदे मेडिकल कॉलेज येथील ऑपरेशन थिएटरच्या बाजूस असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यावर उपचार सुरू होते.स्वप्नील यास रात्री सुमारे १०.३० चे सुमारास डॉ. जितेंद्र खोडीलकर यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.