ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण
ग्लोबल पुरस्काराने सन्मानित (Global Teacher Award Winner) करण्यात आलेले शिक्षक रणजितसिंह डिसले ((Ranjit Singh Disale) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सोलापूर : ग्लोबल पुरस्काराने सन्मानित (Global Teacher Award Winner) करण्यात आलेले शिक्षक रणजितसिंह डिसले ((Ranjit Singh Disale) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार,( Ajit Pawar) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती.
ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सोलापूरचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये गुरुजींना शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे शिक्षण क्षेत्रात काय नवीन प्रयोग करता येतील यावर सविस्तर चर्चा केली होती. तसेच राज्यपाल भगसिंह कोश्यारी (B S Koshyari) यांनी त्यांचा राजभवन येथे सत्कार केला . पुरस्कार जाहीर झाल्यावर राज्यपालांनी त्यांचे फोनवरुन अभिनंदन करून राजभवन भेटीचे निमंत्रण दिले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्लोबल टिचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांनी वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डिसले गुरूजींकडे राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारसोबत काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार डिसले यांनी तसा आराखडाही सरकारला सादर करणार आहेत. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब यावेळी उपस्थित होते.
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. हा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील १४० देशांतील १२ हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे.