चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथः बकरी ईदनिमित्त (Bakri Eid) कुर्बानीसाठी बोकड लाखांच्या दरात खरेदी केले जातात. गेल्या काही दिवसांपासून एक बोकड चर्चेत आला होता. या बोकडाची किंमत तब्बल 1 कोटी 12 लाख 786 इतकी लावण्यात आली होती. मात्र, ईदला कुर्बानी देण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. आजारी असल्यामुळं या बकऱ्याचे (Goat Died) निधन झाले आहे. (Allah Name on Goat died)


अंबरनाथमधील शकील शेख यांच्या बोकडाची चर्चा चांगलीच गाजली होती. ईदसाठी बोकडाची किंमत 1 कोटी 12 लाख 786 इतकी लावण्यात आली होती. शेरु असं या बोकडाचे नाव होते. हा बकरा गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ परिसरात आकर्षणाचा विषय ठरला होता. मात्र त्याच्या आकस्मात मृत्यूने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. 


तब्बल सव्वा कोटींचा बकरा


अंबरनाथ परिसरातील जुना भेंडी पाड्यात राहणाऱ्या शकील शेख यांच्या मालकीचा हा बकरा होता. या बकऱ्याच्या अंगावर नैसर्गिकरित्या असलेल्या काळ्या आणि पंढऱ्या रंगात उर्दूमध्ये अल्लाह आणि मोहम्मद असे शब्द होते. त्यामुळे याची किंमत शकील यांनी एक कोटी बारा लाख 786 रुपये लावली होती. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत होता.


100 किलो वजन


100 किलो वजनाचा हा बकरा होता तर त्याला केवळ दोन दातच होते. शकील हे शेरुचे आपल्या घरातीलच एक व्यक्ती असल्याप्रमाणे पालन पोषण करत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा बकरा सातत्याने आजारी असायचा. त्याला दररोज दोन हजार रुपये उपचारासाठी खर्च येत होता. मात्र दुर्दैवाने या बकऱ्याच मृत्यू झाला. या घटनेने शकील यांना मोठा धक्का बसला आहे. 


शेरुच्या पालनपोषणासाठी शकील दररोज त्याला सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका असे पदार्थ खायला देत असे. विशेष म्हणजे त्याच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरादेखील लावला होता. तसंच, शेरुच्या विक्रीतून आलेल्या पैशातून त्याला त्याच्या मूळ गावी गरीब मुलांसाठी शाळा बांधण्याचे आणि रुग्णवाहिका खरेदी करायचे होते. मात्र, आता त्याचे स्वप्न भंगले आहे.


दरम्यान, शकील शेख यांनी यापूर्वीही त्यांच्याकडे असलेल्या बोकडाची किंमत 12 लाखांपर्यंत ठेवली होती. शकील यांना बोकड आणि बकरी पाळण्याची विशेष आवड आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्याचे रेडिमेड कपड्यांची विक्री करण्याचे दुकान आहे.