कोल्हापुरातील मटण वादानंतर आता शेळी चोरट्यांचा धुमाकुळ
कोल्हापूर जिल्ह्यात शेळी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात शेळी तसेच बकरी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बकऱ्यांची चोरी होण्याच्या घटना दिवसा ढवळ्या होत असल्यामुळे बकऱ्यांना साभांळायचे कसे, असा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे. एकीकड मटण दर वाढीचे आदोलन आणि दुसरीकडे होत असलेल्या चोरीच्या घटनामुळे मेंढपाळ चिंतेत आहे.
याआधी बकरी चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र, मटण दरवाढीनंतर असा प्रथमच प्रसंग पुढे आला आहे. काही दिवसापूर्वीच कोल्हापूर शहरातील बाळू शिंदे यांच्या तब्बल १३ शेळ्या चोरीला गेल्या होत्या. या घटनेला पाच दिवस पूर्ण होण्याअगोदर आता पुन्हा शहरात बकऱ्यांची चोरी झाली आहे. शहरातील बिजली चौक इथ राहात असणाऱ्या सुदाम पोळ यांच्या देखील सहा बकऱ्या चोरट्यांनी लंपास केल्यात. त्यामुळे त्यांनी शहरातील राजारामपुरी पोलीसांत गुन्हा नोंद केला आहे.
एकीकडे कोल्हापूर शहरात मटण दराचे राजकारण सुरु आहे. तर दुसरीकडे शेळ्या बकऱ्यांची चोरी होत आहे. यामुळे कोल्हापूर शहरात नेमके चालल काय, आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या मेंढपाळांच्या बकऱ्या चोरण्यात आल्या त्या एकाच पद्धतीने चोरण्यात आल्याच दिसून येत आहेत. त्यामुळे मेंढपाळांमध्ये भितीच वातावरण पसरले आहे.
शेळीपालन किंवा मेंढपाळ व्यवसाय करुन अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवितात. पण आता चोरीमुळे अनेकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली आहे.. एकीकड सुरु असलेले मटण दराचं आंदोलन आणि दुसरीकडे बकऱ्यांची कमतरता, त्यात ३१ डिंसेबरच्या सेलिब्रेशनची तयारी. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर चोरीमुळे चिंता व्यक्त करण्यात येत नाही.