Gold Loan : गोल्ड लोनवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. गोल्ड लोन देताना सोन्याची शुद्धता नीट तपासण्याचे निर्देश अर्थमंत्रालयानं सर्व सरकारी बँकांना दिले आहेत.  यामुळे आता गोल्ड लोन मिळवणे कठिण होणार आहे. तसेच अपेक्षित दर मिळणे देखील सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याला सध्या उच्चांक दर मिळतोय.. सोनं तारण ठेवून कर्ज देताना सोन्याच्या बाजार भावानुसार ऐंशी टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्यात येते.  सोन्याचा भाव त्याच्या शुद्धतेनुसार कमी-अधिक होत असतो. याच पार्श्वभूमीवर शुद्धतेचे परिमाण लक्षात घेऊनच कर्जवाटप करावे अशा सूचना सरकारनं  बँकांना दिल्या आहेत. दरम्यान गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने सोने तारण ठेवून कर्ज वाटप करणाऱ्या काही कंपन्यांवर निर्बंधही आणलेत.


सोन्याला झळाळी


सोन्याला चांगलीच झळाळी मिळाली आहे. सोन्याच्या दरात हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर आता 67 हजार 500 रुपये तोळा झालाय. तर चांदीचा दर 74 हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचल आहे. अमेरिकेत होणारी निवडणूक आणि बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भाववाढ झालीये. तसेच आगामी काळात निवडणूका असल्यानं  मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढलीये...त्यामुळे येत्या काळात सोन्या चांदीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सोने व्यापा-यांनी वर्तवली आहे.


देशात तब्बल 40 किलो सोनं, 6 किलो चांदी आणि 5.43 कोटींची रोकड जप्त 


देशात तब्बल 40 किलो सोनं, 6 किलो चांदी आणि 5.43 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. देशभरात DRIनं ही कारवाई केली. DRIने देशात तीन ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. अररिया, मुंबई, मथुरा आणि गुरुग्राममध्ये ही कारवाई करण्यात आली..याप्रकरणी 12 जणांना अटक केली आहे.   


बटरच्या पॅकमधून सोन्याची तस्करी 


मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केलीय. दुबईहून आलेल्या भारतीय नागरिकाने बटरच्या पॅकमधून सोन्याची तस्करी केलीय. 20 तोळे सोनं बटरच्या पॅकमध्ये लपवलं होतं. कस्टम विभागाने हे सोनं जप्त केलं असून 
प्रवाशाकडून दोन आयफोनही जप्त केलेत. 


बनावट सोनं खरं भासवून बँकेला गंडा 


कोल्हापुरात बनावट सोनं खरं भासवून बँकेला गंडा घालणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. 22 जणांनी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये बनावट सोनं गहाण ठेवून बँकेची 60 लाखांना फसवणूक केली होती. या प्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी  6 जणांना अटक करण्यात आली. बँकेचा अधिकृत मूल्यांकनकार सागर कलघटगी याचा यात संशयित आरोपी म्हणून समावेश आहे.