Gold Mines In Vidarbha | विदर्भात दडलाय सोन्याचा खजिना? नागपूर, गडचिरोलीत सोन्याची खाण?
Gold Mines In Vidarbha : महाराष्ट्रातील विदर्भाच्या भूगर्भात आहे कोट्यवधींचं सोनं? महाराष्ट्रातून निघणार सोन्याचा धूर? पाहा स्पेशल रिपोर्ट
पराग ढोबळेसह अमर काणे, झी 24 तास, नागपूर : निसर्गानं विदर्भाला भरभरून दिलंय. इथल्या जमिनीत कोळशापासून ते मँगनीजपर्यंत मोठी खनिजसंपत्ती आढळते ( coal manganese mines). मात्र आता याच जमिनीत सोन्याचा साठाही दडल्याचा दावा ( Gold Mines) केला जातोय. GSI अर्थात भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियानं विदर्भाच्या जमिनीत काय दडलंय याचा शोध लावलाय. सोन्याचं हे गूढ नक्की आहे तरी काय? खरंच विदर्भाच्या जमिनीत खजिना दडलाय का? झी 24 तासच्या टीमनं प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
गावकरी आस लावून बसले...
GSI च्या संशोधकांनी दिलेल्या अहवालात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीच्या भूगर्भात सोन्याचा साठा आढळून आलाय. त्यानुसार 1984-85 मध्ये नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूरमधील पुल्लर, परसोरी, थूतानबोरी आणि गडचिरोलीत सर्वेक्षणही करण्यात आलं. इथल्या घनदाट जंगलात सोन्याचा साठा असल्याचं सांगण्यात येतंय. आता सोन्याच्या आशेनं इथले गावकरी आस लावून बसलेत. कधीतरी आपलं नशीब फळफळेल या अपेक्षेनं त्यांनी आपली जमीन विकण्याचा विचारही केलेला नाही. अर्थात हे सोनं शोधण्यासाठी सरकारी स्तरावर पुरेसे प्रयत्न होत नाहीत अशीही स्थानिकांची तक्रार आहे.
याबाबत काय म्हणतात गावकरी? पाहा व्हिडीओ प्रतिक्रिया
जमिनीत सोन्याचा साठा असल्याचं स्पष्ट तर...
आजच्या निकषांनुसार सांगायचं झालं तर आधी झालेलं सर्वेक्षण हे G4 स्तरावरील होतं. त्यात पूर्व विदर्भाच्या जमिनीत सोन्याचा साठा असल्याचं स्पष्ट तर झालं, मात्र हे सोनं किती प्रमाणात आहे हा प्रश्न निरूत्तरीतच आहे. त्यामुळे ठोस निष्कर्षासाठी आणखी सर्वेक्षण व्हायला हवं असं भूवैज्ञानिक सांगतायेत.
भूवैज्ञानिक सर्वेक्षण काय म्हणतं? पाहा व्हिडीओ
सोन्याचा साठा सापडला तर...
विदर्भाचा भाग हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे अशी ओरड नेहमीच असते. मात्र विदर्भाच्या कुशीत दडलेला सोन्याचा साठा सापडला तर महाराष्ट्रात आणि पर्यायानं पुन्हा एकदा आपल्या देशात सोन्याचा धूर पाहायला मिळेल यात शंका नाही.