Gold price Hike : सोनं प्रचंड महागलं! दरवाढीमागे कारण काय? जाणून घ्या आजचा प्रतितोळा दर
Gold Silve Price Today : आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. पण सोने आणि चांदीच्या दरवाढी मागे नेमक कोणत कारण आहे?
Gold Silve Price Today News In Marathi : आज देशभरात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने-चांदीच्या किमती कमी-जास्त होतानाचा ट्रेंड या दोन महिन्यात दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी सोन्याच्या किमती वधारताना दिसल्या आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले असताना चांदीच्या ही दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी तर चांदी 1500 रुपयांनी महागली होती.
ऐन लगनसराईत बाजारपेठेत सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 64 हजार 600 रुपये होता. त्यात जीएसटी जोडल्यास ग्राहकांना प्रत्यक्ष खर्च 66 हजार 500 रुपये झाला असता. सोमवारी, 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह 65,200 रुपये मोजावे लागतील. एकाच दिवसात 1,300 रुपयांनी वाढ झाली. सायंकाळी 66 हजार 500 रुपयांची नोंद झाल्यानंतर रात्री पुन्हा 300 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (6 मार्च 2024) 64,460 रुपये आहे. तर सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, ते 73,240 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात सोन्याची सरासरी किंमत 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच दर 65 हजार रुपयांवर पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील सत्राच्या तुलनेत 800 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीची घास वाढली आहे. 900 रुपयांच्या वाढीसह चांदी 74,900 रुपये किलोवर पोहोचली आहे. गेल्या सत्रातच चांदी 74,000 रुपये प्रति किलोवर होती.
दरवाढी मागे कारण काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव सुमारे $2,110 प्रति औंस आहे. तो मागील ट्रेडिंग सत्रापेक्षा एक टक्का जास्त आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकन सेंट्रल बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किंवा मार्चच्या मध्यात चिन्हे दिसली असती. मात्र, जून महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल, या अपेक्षेने सोनीचे व्याजदर वाढताना दिसत आहेत. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 2,400 रुपयांनी वाढला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.51 टक्क्यांनी वाढून 64,791 रुपयांवर बंद झाला.
- मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 59,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,088 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 64,460 रुपये आहे.
- नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 59,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64,460 रुपये आहे.
- नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 59,088 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 64,460 रुपये आहे.