Gold Silver Price Hike In Marathi : अनेकांना सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असते. अशातच मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याच्या भावात अनेक बदल पाहायला मिळत आहे. आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसला आहे. सप्टेंबर 2023 ते डिसेंबरपर्यंत सोन्याच्या भावात अधिकच बदल झाल्याचे पाहायला मिळत. त्यातच आज पुन्हा सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. कारण आजही सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणसळत्या काळात सोन्याच्या दागिनांना अधिक मागणी असते. त्यातच मार्च महिन्यात सोन्याच्या दरात 2300 रुपयांनी तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. 1 मार्चपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे लगनसराईच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान 1 मार्च ते 6 मार्चपर्यंत 2300 रुपयांची वाढ झाली असून यापूर्वी, सोन्याने डिसेंबर 2023 मध्ये उच्चांकाची पातळी ओलांडली आहे. आज सोन्याच्या किमतीने 65 हजारांचा आकडा पार केला आहे. 


आज (7 मार्च 2024 ) गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, 22 कॅरेटनुसार सोन्याच्या 1 ग्रॅमसाठी त्याची किंमत 6,025 रुपये असेल. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमसाठी 65,710 रुपये मोजावे लागतील. आज सोन्याची किंमत 430 रुपयांनी वाढली आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत 74.400 रुपये असेल. चांदीच्या दरात किलोमागे 100 रुपयांची घसरण झाली. 


महाराष्ट्रातील सोनं-चांदीचे दर 


तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (7 मार्च ) 65,490 रुपये असू  चांदी 73,950 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.तभर बदलतात. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 59,904 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 59,904 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,350 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,904 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,350 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 59,904 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 65,350 रुपये आहे.