पुणे: सोने तस्करीचे लोण आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतही पोहोचले आहे. पुणे, विमानतळावर सोन्याची तस्करी उघडकीस आलीय. एका महिला प्रवाशाकडून तब्बल १ कोटीचं सोनं जप्त करण्यात आलंय. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं गुरुवार ही कारवाई केली. याप्रकरणी रेहाना फैजान अहमद खान या महिलेला अटक करण्यात आलीय. ती मुळची मुंबईतील कुर्ल्याची आहे. तिच्याकडे ३ किलो ४१ ग्रॅम इतकं २४ कॅरेट सोनं मिळून आलय.


सिंथोटिक रबर पेस्टमध्ये मिसळलं सोनं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावरील पोलिसांनी रेहान खान नामक महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे तिची कसून चौकशी केली असता तिच्याकडे तस्करीचं सोनं असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. शरीरावर लपवलेल्या सिंथोटिक रबर पेस्टमध्ये तिनं हे सोनं मिसळलेलं होतं.


पोलिसांनी तपास केला सुरू


पोलिसांनी फैजान अहमद खान या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.