पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी उघडकीस आलीय. एका महिला प्रवाशाकडून तब्बल १ कोटीचं सोनं जप्त करण्यात आलंय. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं गुरुवारी ही कारवाई केलीय. याप्रकरणी रेहाना फैजान अहमद खान या महिलेला अटक करण्यात आलीय. ती मुळची मुंबईतील कुर्ल्याची आहे. तिच्याकडे ३ किलो ४१ ग्रॅम इतकं २४ कॅरेट सोनं सापडलं आहे. शरीरावर लपवलेल्या सिंथोटिक रबर पेस्टमध्ये तिनं हे सोनं मिसळलेलं होतं. 


मात्र, विमानतळावर तिची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी तिची झडती घेतली आणि तस्करीचा प्रकार उघडकीस आला. पुणे विमानतळावर याआधीदेखील अनेकदा चोरीचं सोनं पकडण्यात आलंय.