गोंदिया : शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला संस्कार देणारे मंदिर असते. कुटुंबानंतर मुलांवर संस्कार देणाचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवण्याचं काम शाळा करत असते. अभ्यासाप्रमाणेच कला आणि खेळ यांसारख्या गुणांना आकार देण्याचं काम देखील शाळचं करत असते. पण, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार गोदिंया जिल्ह्यात घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदिया जि्ल्ह्यातील मजितपूरच्या शासकीय आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळासाठी घेऊन जाताना शाळेच्या प्रशासनाने चक्क ट्रकचा वापर केला आहे. एकाच ट्रकमध्ये आदिवासी शाळेच्या तब्बल 120 मुलामुलींना अक्षरश: कोंबून खेळण्यासाठी घेऊन जात होते. शाळेच्या या बेजबाबदारपणामुळे या विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी- विद्यार्थीनींची प्रकृती खालावली आहे. तर, श्वास गुदमरून काही विद्यार्थी- विद्यार्थींनी बेशुद्ध देखील झाले आहेत.


या विद्यार्थ्यांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. कोयलारी आश्रम शाळेवरून परतताना हा प्रकार घडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.