मुंबई : विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सोमवारी 24 जानेवारीच्या मध्यरात्री झायलो कारला अपघात झाला. या अपघातात 7 भावी डॉक्टरांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यामधील तिरोडा गोरेगाव विधासभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता. विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कारचा मृत्यू झाला. (gondia district tiroda goregaon assembaly constituency mla vijay rahangadale emotional facebook post after his son avishkar death)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुत्र वियोग जगातील सर्वात मोठं दु:ख आहे. आविष्कारच्या मृत्यूमुळे विजय यांच्यावर मोठा आघात झाला. दरम्यान विजय यांनी आपल्या मुलाच्या आठवणीत एक भावूक पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे.


बर्थडे साजरा करुन परततताना अपघात


हे 7 विद्यार्थी नागपूर-तुळजापूर महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेल्याचं समोर आलं. या 7 पैकी एक असलेल्या पवनचा बर्थडे होता. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी हे सर्व मित्र मोठ्या उत्साहात नागपूर-तुळजापूर महामार्गवर देवळी इसापूर इथं असलेल्या 'माँ की रसोई' हॉटेलमध्ये गेले. 


तिथे जवळपास 4 तास बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता त्या हॉटेलमधून निघाले. मात्र त्यानंतर काही वेळाने यांच्या गाडीला अपघात झाला. यात दुर्देवाने 7 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे 7 विद्यार्थी सावंगीतील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते.