मुंबई : उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतलाय. राज्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र हिमालय परिसरातल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांनंतर इशारा मागे घेण्यात आल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय.


बळीराजाला दिलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये गारपिट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. त्यापाठोपाठ पुन्हा इशारा देण्यात आल्यानं सरकारी यंत्रणा आणि शेतकऱ्यांची झोप उडाली होती. मात्र आता गारपीट होण्याची शक्यता मावळल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय. 


पावसाची शक्यता


रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवलीय. पुढच्या 48 तासात कोकण किनारपट्टीवर वादळी वा-यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. त्यामुळे प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्यात.  या अवकाळी पाऊस आणि वातावरण बदल्याच्या इशा-याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.