मिलिंद आंडे / वर्धा : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना राज्यात  रेमडेसिवीर ( Remedesivir) औषधाचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. बेडही मिळत नसल्याने रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. तर अनेक रुग्णांच्या जिवावर बेतले आहे. आता राज्यासाठी एक चांगली बातमी आहे. विदर्भातील वर्धा येथे आजपासून  रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन सुरु झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही, अशी शक्यता आहे. (production of Remedesivir started at Wardha)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीत रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन होत आहे.  जेनेटिक सायन्स लॅब कंपनीत दररोज 30 हजार वायल या कंपनीत तयार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  या कंपनीला तीन दिवसात परवानगी मिळवून दिली.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आता वर्धा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला रेमडीसीवरचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


कोरोना रुग्णांना उपचारासाठी अतीशय महत्वाचे समजले जाणारे इंजेक्शन म्हणजे सध्या रेमडेसिवीर याला प्राधान्य देण्यात येत आहे. कारण हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी राज्यात संजीवनी ठरत आहे. या रेमडीसीवर इंजेक्शनची मोठी मागणी असल्याने त्याचा काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. हा काळा बाजार थांबावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब या कंपनीला पाठपुरावा करीत रेमडीसीवरचं बनविण्याची परवानगी मिळवून दिली आहे. 


आता वर्ध्यात हे रेमडीसीवर बनत असल्याने कोरोना रुग्णांना आता हे औषध वेळेवर मिळणार आहे. त्यामुळे विदर्भात आणि राज्यात आता याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे.