अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नागपुरात भयानक ठरली आहे. कोरोनानं थैमान घातलेला मार्च, एप्रिल महिना तर  नागपूरकर कधीच विसरू शकणार नाही. एप्रिलमध्ये  तर दिवसाला कोरोना मृत्यूसंख्या शंभरीपलीकडे गेली होती. कोरोनाचा भयानक कहर पाहून सर्वजण हादरले होते. मात्र आता नागपुरला घातलेला कोरोनाचा विळखा सुटत असल्याचं चित्र आहे. नागपुर शहरात 25 मे मंगळवारला कोरोनानं 4 मृत्यू झाले. 22 फेब्रुवारीनंतर प्रथमच नागपुरत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची रुग्णांची संख्या 5 पेक्षा कमी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात कोरोना नियंत्रणात येत आहे. मंगळवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या चौपट होती. काल 470 कोरोनाबाधितांची वाढ झाली...तर कोरोनामुक्त  1981जण झाले. तर एकूण 25 जणांचा मृत्यू झाला यांपैकी  11 जिल्हाबाहेरील मृत्यू आहे. तर 10 ग्रामीण भागातील व 4 शहरातील मृत्यू आहे. कोरोनानं आतापर्यंत नागपुरात 8822 बळी घेतलेय. कोरोना मृत्यूचं मार्च आणि एप्रिल महिन्यातील नागपूर शहरातील तांडव फारच भयावह होतं. सतत एब्युलंसचा आवाज, बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातवाईकांची धावाधाव. ऑक्सिजनचा तुडवडा.


काही औषध मिळताना कोरोना नातेवाईकांची होणारा वेदनादायी त्रास हे सर्व दृश्य सातत्यानं दिसत होतं. त्यातही एप्रिल महिन्यातील काही दिवसांमध्य नागपुरात स्मशानभूमितील चित्र मन विषण्ण करणार होतं..या महिन्यात कोरोनाबळींची संख्या काही दिवसांमध्ये तर शतकापलीकडे गेली होती. त्यामुळं कोरोनाचा हा कहर कधी कमी होईल याच चिंता शहरात प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होती. मे 15नंतर कोरोनाचं नागपूर शहरातील चित्र नियंत्रणात येत असल्याचं दिसून येतंय..एकीकडे ग्रामीण भागात अजूनही कोविडचा प्रादुर्भाव अजूनही खूप कमी झाला नसल्याचं दिसून येत तर शहरात कोरोनाला नियंत्रणात आला आहे.


काल नागपुरात कोरोनाची मृत्यूसंख्या 4 पर्यंत उतरली आहे. 22 फेब्रुवारीनंतर प्रथमच कोविड बळींचा हा आकडा 5 च्या खाली आहे. शहरात ग्रामीणच्या तुलनेत कोविडबाबतच्या निर्बंधाचं कठोरतेनं  होत  असलेलं पालन हे कोरोना नियंत्रणात आणण्याचं महत्वाचं ठरलं आहे. शहरातील रुग्णांची घटलेली संख्या आणि मृत्यूंमध्ये झालेली घट सर्वांसाठी दिलासादायक ठरली आहे. मात्र त्याचबरोबर रुग्णंसंख्येचा हा आलेख पुन्हा वाढू नये म्हणून कोविड नियमांचं काटेकोट पालनं, आरोग्यबाबत शिस्त आणि काळजी हे आपल्यापैकी प्रत्येकानं यापुढेही घेणं तितकच गरजेच आहे. कारण कोरोना सध्या कमी झालेला दिसत असला तरी त्याचा धोका अजूनही कामय आहे.