दिलासादायक : कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह
कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह आले
औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी एक चांगली बातमी आहे. औरंगाबाद मध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत याचाच अर्थ रुग्ण कोरोना मुक्त झाली आहे, तसेच त्यांच्या संपर्कातील २० विद्यार्थ्यांवर आणि अन्य ४ जणांचे रिपोर्ट्स ही निगेटिव्ह आले आहेत, या महिलेच्या कुटुंबियांचे रिपोर्ट्स सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. म्हणजे याक्षणी औरंगाबादेत आता एकही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण नाही असं म्हणता येईल.
नवे ११ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाचे आणखी ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाचे ६३ रुग्ण झाले आहेत. यातले १० रुग्ण मुंबईचे तर १ रुग्ण पुण्याचा आहे. ६३ पैकी १४ लोकांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. तर बाकीचे रुग्ण हे परदेशातून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ज्यादा रेल्वे गाड्या
गर्दी कमी होत नसेल तर लोकल ट्रेन बंद कराव्या लागतील. शहराकडून लोकं गावाकडे जात आहेत, त्यामुळे ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याची विनंती आम्ही रेल्वे मंत्र्यांना करणार आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.
दहावीचा पेपर पुढे
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी झी २४ तासशी बोलताना दिली आहे. सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता.