पुणे : सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे ३ कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आहेत. कंपनीच्या मांजरी कार्यालयातून लोहगाव विमानतळापर्यंत विशेष पोलीस बंदोबस्तात हे कंटेनर रवाना झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनरची पूजा केल्यानंतर या कोल्ड चेन व्हॅन लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या. आज देशात एकूण 13 ठिकाणी ८ विविध विमानांमधून कोविशिल्ड लसीची वाहतूक केली जाणार आहे. पहिलं विमान सकाळी दिल्लीला रवाना झालं. 



पहिल्या टप्प्यात या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्ससाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सुरुवातीला दोन कोटी डॉसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 65 लाख डोस देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेय. 


वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या कोल्ड चेन व्हॅन वापरण्यात आल्या आहेत. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या वाहनांमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे.