सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे.  गेल्या २४ तासात कोयणा पाणलोट क्षेत्रात ३६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासात ४६८ मीमी पावसाची नोंद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवजा तालुक्यात ४८६ मिमी पाऊस झाला. कोयना पाणलोट क्षेत्रातील दोन दिवसाच्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या धरणात १७.११ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.


शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकण आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पावसानं सुरुवात केल्यावर लगेचच ब्रेक घेतला. पण गेल्या 48 तासात त्यानं जवळपास पंधरा दिवसांची कसर भरुन काढली आहे. राज्याच्या सर्वचं भागात आता पेरण्यांनी जोर धरला आहे.