पुणे : पुण्यातील भोर तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. पारंपरिक भलरीची गाणी म्हणतं महिला शेतकरी भात लावतानाची दृश्य सध्या या भागात जागोजागी पाहायला मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडा-यात पावसानं जोरदार हजेरी लावली. हा पाऊस धानासाठी पोषक ठरणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोवणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून, तलावांना नवसंजिवनी मिळाली आहे. 


गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जनतेला उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. बळीराजासुद्धा सुखावला असून भात रोवणीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.