Google चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात
Google Data Center News : गूगल (Google) जागतिक पातळीवर आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली आहे.
Google Data Center News : गूगल (Google) हे नाव कोणाला माहित नसेल अशी आजच्या युगात व्यक्ती नसेल. (Google News In Marathi) काही इंटरनेटवर शोधायचे असेल तर गूगल कर म्हणून असे सांगितले जाते.( Google Data Center ) गूगल हा एक असा खजाना आहे की, जे टाकाल त्याची माहिती काही क्षणात तुमच्या समोर येते. आता जागतिक पातळीवरचे गूगल आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली. Google ने नवी मुंबईत 28 वर्षांसाठी भाड्याने जागा घेतली आहे. महिन्याचं रेंट वाचून व्हाल हैराण व्हाल.
3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरसाठी जागा
गूगलने (Google) नवी मुंबईत 28 वर्षांसाठी जागा भाड्याने घेतली आहे. याबाबतचा करार झाल्याची माहिती हाती आली आहे. पुढच्या दोन वर्षांत नवी मुंबईत डेटा सेंटर उभारण्याचा मानस आहे. (Google Data Center in Navi Mumbai) त्यासाठी गूगलने जागा भाड्याने घेतली आहे. नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील 3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरसाठी जागा असणार आहे. रेडेन इन्फोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गूगल इंक कंपनीने आमथिन इन्फो पार्क्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही जागा घेतली. याचं महिन्याचं भाडे 8.83 कोटी रुपये आहे.
नवी मुंबईतील जागा शोधल्यानंतर आता याबाबतचे सर्व करार करण्यात आले आहेत. त्यामुळे गूगल डेटा सेंटर नवी मुंबईत उभे करणार आहे. त्यासाठी महिन्याच्या भाड्यापोटी भाडे 8.83 कोटी रुपये मोजणार आहे. तसेच यामध्ये वार्षिक 1.75 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही कंपन्यांनी मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
गूगल ही सुविधा आता बंद करणार
दरम्यान, Google ने नवी मुंबईत जागेबाबत ऑक्टोबर 2022 मध्ये करारावर स्वाक्षरी झाल्याची चर्चा आहे. ही इमारत आठ मजली असून नवी मुंबईतील प्रस्तावित डेटा सेंटर दोन वर्षांत सुरु होईल, असे सांगण्यात येत आहे. गूगलच्या या डेटा सेंटरसाठी रेडेन इन्फोटेक इंडियाने 7 कोटी रुपये मोजल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 26 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती मिळाली आहे. गेल्यावर्षी गूगल इंक कंपनीला 10 वर्षांसाठी सुमारे 4.64 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली होती. नोएडाच्या सेक्टर 62 मध्ये असलेल्या अदानी डेटा सेंटरमध्ये गूगलने जागा भाड्याने घेतली आहे.
तर दुसरीकडे Google Stadia ही सुविधा लवकरच बंद करणार आहे. मात्र ही सुविधा बंद झाल्याने फारसा परिणाम होणार नाही, त्यामुळे युजर्सनं घाबरुन जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.