योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : तंत्रज्ञानाचा अतिवापर अंगाशी आल्याच्या अनेक घटना आपण एकल्या असतीलंच.असाच प्रकार या घटनेत घडला आहे. गुगल मॅपच्या बळावर बिनधास्त धावणाऱ्य़ा एका कारला अपघात झाल्याची घटना घडलीय. गुगल मॅपने चुकीचे इँडिकेशन दिल्याने ही घटना घडल. यामध्ये दोघा पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने अपघातग्रस्तांच्या कुंटूंबियांवर शोककळा पसरलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


औरंगाबाद जिल्ह्यातून भंडारदऱ्यातील सह्याद्रीच सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली. कोल्हार घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली. हे सर्वजण गुगल मॅपच्या आधारे कळसुबाईला जात होते. मात्र प्रवास करता करता त्यांची क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर तिसऱ्याने गाडीच्या काचेतून उडी घेतल्याने तो बचावला आहे. 


वकिली करत असलेले आशिष प्रभाकर पोलादकर, (वय 34) रा.पोलाद तालुका सिल्लोड,रमाकांत प्रभाकर देशमुख (37) रा. ताड पिंपळगाव, ता.कन्नड,वकील अनंत रामराव मगर (36) रा.शिंगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हे प्रवाशी या गाडीतून प्रवास करत होते. यातील दोघांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेवेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्द पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती. 


दरम्यान कृष्णवंती नदी पात्रातून जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली आहे.तसेच राजूर ग्रामीण रुग्णालयात  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेनंतर वाचलेला मित्र व नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.