पुणे : एका महिन्यापासून राज्यातील ३ कमिश्नर आणि २ एसपी यांना गुंजारा देणारा कुख्यात गुंड गज्या मारणेला अखेर अटक झाली. त्याला अटक झाल्यानंतर गज्या मारणे याने चक्क पोलिसांना सलाम ठोकला आहे. इतक्या अंधारात गाडी पण ओळखली आणि मलाही ओळखलं असं म्हणत त्याने मेढा पोलीस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट' अशी प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गजा मारणे याला शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी अगदी फिल्मी स्टाईलने पकडलं. यावेळी त्यांच्यासोबत वाहन चालक जितेंद्र कांबळे होते. गजा मारणेला पकडल्यानंतर सातारा पोलिसांचे कौतुक होत आहे. मेढा पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. गजा मारणेला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.


गजा मारणेला अटक झाल्यांनंतर ही बातमी लगेचच संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. गजा मारणेसोबत त्याच्या ३ साथीदारांना ही पोलिसांनी अटक केली. गजा मारणे अटकेनंतर म्हणाला की, महिनाभर मी ३ कमिशनर आणि २ एसपींना गुंगारा देत होतो. मात्र फक्त दोन दिवसासाठी घात झाला. पकडल्या गेल्यानंतर गजा मारणेने देखील पोलिसांच्या या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त केलं.