सांगली : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर ( gopichnd padalkar) यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर हा अपघात झाला. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले आहेत.


मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. अपघाताची गटानं कळताच येथे शकडो कार्यकत्यांनी धाव घेतली. जखमी ब्रम्हानंद पडळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ब्रह्मानंद पडळकर यांच्या ड्रायव्हर सह आणखी तिघे या अपघातात जखमी झाले आहेत. या सर्वाना नजीकच्या विटा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे विटा-कुंडल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.