Ajit Pawar's attack on Maharashtra Government : सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ' शासन आपल्या दारी' यांच्यामाध्यमातून शेकडो कोटी रुपये खर्च करुन  खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. राज्य सरकारने जो निर्णय घेतला नाही, अशा जाहिराती दाखवून श्रेय घेण्याचे काम सुरु आहे. यांचे डोके ठिकाणावर आहे का ? त्या दोघांनी एकत्र बसावे काय जाहिरात करतात याचा विचार करा. सीएम यांनी शहरी भागात विषयी माहिती नेमकी काय, जाहिराती बघाव्यात, असे अजितदादा म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन खात्यात बदल्या करताना भ्रष्टाचार झाल्याची टीका अजित पवार यांनी यावेळी केली. काही ठरावीक आमदार यांना बदल्यांचे अधिकार दिले. ते आमदारच बदली करतात, शासन आपल्या दारी आणले तरी फसवणूक केली जात आहे, असे अजित पवार म्हणाले. अनेक आयएएस अधिकारी चांगली पोस्ट नको म्हणतात. नको ती काम करुन घेतात असे अधिकारी खासगीत सांगतात, असे ते म्हणाले.


... तर मी राजकारण सोडेन - अजितदादा


शिंदे गटाने विरोधी पक्षनेते अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी किती खोके जमवले ते सांगावं, असे आव्हान शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिले. तर एक आरोप सिद्ध करावा, मी राजकारण सोडेन आणि आरोप खोटा निघाला तर खासदार तुमाने यांनी घरी बसावं, असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी दिले आहे. 


 उद्धव ठाकरे यांना अजित पवार यांचा टोला


दरम्यान, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांवरुन अजित पवार यांनी उद्धव ठाकरे याचे नाव न घेता टोला मारला. काही जण मुलांना घेऊन सुट्टीसाठी बाहेर गेलेत ते परत आले की तारखा ठरतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला. 


 लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता?


लोकसभा आढावा महाविकास आघाडी पक्ष घेत आहेत. चाचपणी करण्याचा अधिकार सगळ्यांना आहेत, असे सांगत पुणे - चंद्रपूर लोकसभा जागा लागण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी याबाबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. चंद्रपूर जागा काँग्रेसचा अधिकार पण पुणे लोकसभाबाबत चर्चा करावी लागणार आहे, असे त्यांनी यावेळी संकेत दिलेत. 


अजित पवार 9 जून एनसीपी वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्हात मेळावा आयोजन केले होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार चक्रीवादळ शक्यता आहे. यामुळे तुर्तास नियोजित कार्यक्रम  रद्द केला आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.