नागपूर एअरपोर्टच्या नवीन बांधकामासाठी मान्यता
एअरपोर्टचं नवीन बांधकाम करण्यासाठी मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा बोलवण्यात येणार आहे. त्यातून अतिशय अद्यावत एअरपोर्ट, कार्गो टर्मिनल आणि एक नवीन धावपट्टी निर्माण केले जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर : एअरपोर्टचं नवीन बांधकाम करण्यासाठी मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा बोलवण्यात येणार आहे. त्यातून अतिशय अद्यावत एअरपोर्ट, कार्गो टर्मिनल आणि एक नवीन धावपट्टी निर्माण केले जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर एअरपोर्टवर नव्या कोल्ड स्टोरेजचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नागपूर एअरपोर्टवर कोल्ड स्टोरेजची आवश्यकता होती ती आता पूर्ण झाली आहे. येत्या काळात फ्री ट्रेड, वेअरहाउसिंग झोन आणि इतर व्यवस्था करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.