मनमाड : शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिकेवरील रॉकेल पुरवठा बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. शिधापत्रिकेवर रॉकेल पुरवठा पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी मनमाडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने शासनाच्या प्रतिकात्मक यात्रा काढून रॉकेल पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरपीआय भवनपासून सुरु झालेल्या मोर्चामध्ये कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला. रॉकेलअभावी सर्वसामान्यांच्या घरातील स्टोव्ह, बत्ती आणि कंदील पेटत नाही. त्यामुळे नागरिक या वस्तू घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.  रॉकेल पुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकनांनी देण्यात आला आहे.



राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाच्या चर्चेला गुरुवारपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली रस्सीखेच पाहता जागावाटपाचा मुद्दाही ताणला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (रिपाई) सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत १० जागा मिळायलाच हव्यात अशी मागणी केली आहे. 


भाजप आणि शिवसेनेने मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. यापैकी १० जागांवर रामदास आठवले यांनी हक्क सांगितला आहे. तसेच या निवडणुकीत रिपाई  भाजपच्या नव्हे तर स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीमधील इतर घटकपक्षांच्या वाट्याला केवळ आठच जागा येतील. परिणामी इतर घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे.