मुंबई :  mega recruitment for 275000 posts in Maharashtra : आता सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या कामाची. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. (government job opportunities) महाविकास आघाडीने  मेगाभरती मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात लवकरच 2,75,000 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. राज्यात 42 विभागात तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त, असल्याची माहिती समोर आली आहे. 


राज्यात दोन टप्प्यात होणार मेगाभरती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात लवकरच मेगाभरती होणार आहे. 42 शासकीय विभागात तब्बल पावणे तीन लाख जागा रिक्त आहेत. या जागांवर लवकरच भरती निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषदांमधील अनेक विभागांचा पदभार एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविला गेला आहे. त्यामुळे एकावरच कामाचा ताण येत आहे आणि परिणामी कामाचा उरक आवरला जात नाही. अनेक कामे अधिकाऱ्यांविना रखडत आहे.


कृषी, गृह, जलसंपदा, महसूल आणि वन, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य या विभागांमध्ये अनेक रिक्त पदे आहेत. राज्यात अनेक विभागात अशी स्थिती आहे. त्यामुळे ही भरती लवकरच निघण्याची शक्यता आहे.


कोणत्या विभागात किती जागा रिक्त


- गृहविभागात 49 हजार 851
- सार्वजनिक आरोग्य विभाग - 23 हजार 822
- जलसंपदा विभाग - 22 हजार 489
- महसूल व वन विभाग - 13 हजार 557
- वैद्यकीय शिक्षण विभाग 13 हजार 432
- सार्वजनिक बांधकाम विभाग - 8 हजार12
- आदिवासी विभाग - 6 हजार 907
- सामाजिक न्याय विभाग - 3 हजार 821