मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. प्रशासनाने विधानसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्शन ड्युटीसाठी आपल्या मतदारसंघातून दूरवर असलेले कर्मचारी मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सर्व कर्मचारी पोस्टलद्वारे मतदान केलं आहे. इलेक्शन ड्युटीवर असलेल्या  रत्नागिरीतील शिक्षकांनी मतदान केलं आहे. 


नाशिक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मतदानासाठी सज्ज झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात असून ४५७९ मतदान केंद्र असणार आहे. त्यादृष्टीने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्यासह मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप केलं जातंय. तर पोलीस देखील निवडणूक प्रकियेत सज्ज असून शहरात १३२५ कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रात नियुक्ती करण्यात आली असून पॅरॅमिलिटरी फोर्सच्या ४ तुकड्या तैनात असणार आहे.


नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा आणि अक्कलकुवा या चार मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालंय. यावेळी मतदान यंत्रात कुठलीही खराबी येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काही अडचण आल्यास तात्काळ मदत पुरवण्याचे नियोजन प्रशासनाने  केले आहे. मतदानाच्या एक दिवस आधी सर्व केंद्र प्रमुखांनी आप आपल्या मतदान केंद्राचे साहित्य तपासून ताब्यात घेतले आणि हे कर्मचारी हे साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले. 


 


हवामान खात्याने मतदानाच्या दिवशीही पावसाचा इशारा दिला आहे. दोन दिवस पावसाचा इशारा दिल्यानं मतदानावर पावसाचं सावट असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.