मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र मुंबईमधील वाशी इथल्या खाडीत टाकण्यात आली. या शस्त्रास्त्रांचा एसआयटीकडून शोध सुरू करण्यात आलाय. अमेरिकेतील तंत्रज्ञानाची मदत घेऊन शस्त्रांस्त्रांचा शोध घेण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंदराव पानसरे हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील मुख्य आरोपी आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. 



पानसरे हत्येप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.यातील दोन आरोपी तपास यंत्रणेपासून दूर आहेत. यासंदर्भात पानसरे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.