कोल्हापूर : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर गायकवाड याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. त्यामुळे समीरची आता जामिनावर सुटका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. समीर हा सनातनचा साधक म्हणून काम पाहत आहे.


सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गायकवाड याच्या जामीनामुळं या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.


गोव्यातील सनातन संस्थेचा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती. या काळात त्याने अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता. 


त्यांच्यावर न्यायालयात सनातन अंक आणण्यास बंदी होती. तहीरी त्याच्या हातात सनातनचा अंक असल्याची घटना काही महिन्यांपूर्वी उघड झालेय. पानसरे हत्या प्रकऱणातील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड याला सनातन प्रभातचा अंक देवू नये, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले असाताना त्याच्या हातात अंक कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


दरम्यान, या प्रकरणातला दुसरा आरोपी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेची ट्रॅक्स पोलिसांनी अखेर ताब्यात घेतली आहे. तर एसआयटीने सनातनच्या एका महिला साधकाला ताब्यात घेतले.


आशा ठक्कर असे या महिला साधकाचं नाव असून ती पेशाने डॉक्टर आहे. गोव्यातल्या सनातनच्या आश्रमातून तिला  ताब्यात घेण्यात आले आहे. वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरुन ही महिला साधक नार्कोटिक्सची औषधे देत होती, अशी माहिती पुढे येत आहे.


वीरेंद्र तावडे याने खरेदी केलेल्या ट्रॅक्सचा वापर शस्र चालविण्याच्या ट्रेनिंगसाठी तावडे आणि त्याचे इतर सहकारी करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलाय. ही ट्रॅक्स  यवतमाळमधून पोलिसांनी ताब्यात घेतलीय. पोलीस आता तावडेच्या टू व्हिलरचा शोध घेत आहेत.


कोल्हापूर हल्ला घटनाक्रम


- 16 फेब्रुवारी 2015 हल्ला


- 20 फेब्रुवारीला पानसरेंच्या मृत्यू


- 15 सप्टेंबर 2015 सांगलीतून समीर गायकवडला अटक


- 372 पाणी दोषारोप पत्र 73 साक्षीदार


- दोन वेळा सत्र न्यायालय तर एकवेळा उच्च न्यायालयाने फेटाळला होता जमीन अर्ज


- चौथ्या वेळी मिळाला जमीन