Nitin Gadkari On Electric Bus: सरकार येत्या पाच वर्षात भारतातील सर्व शहरात लांब मार्गावर आणि दिल्ली-शिमला, दिल्ली-चंदीगड तसंच मुंबई-पुणेसारख्या लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीटिव्हीचे संपादक संजय पुगलिया यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली होती. त्यावेळी इलेक्ट्रिक बसबाबत भाष्य केलं आहे. बॅटरीच्या किंमतीत घट झाल्याने प्रवाशांच्या तिकिट दरांची किंमतही 30 टक्क्यांनी कमी होऊ शकते. त्याचबरोबर प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 


नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, लिथियम-आयर्न बॅटरीची किंमत 150 डॉलरने कमी होऊन 112 डॉलर प्रति किलोवॅट प्रति तास इतकी झाली आहे. देशातील या विभागातील 350 टक्के वाढीमुळं हे घडलं आहे. जेव्हा यात आणखी घट होऊन 100 डॉलरपर्यंत पोहोचेल तेव्हा इलेक्ट्रिक वाहनेदेखील पेट्रोल-डिझेलच्या वाहनांप्रमाणे चालवणे शक्य होईल. जर तुम्ही एका महिन्यात पेट्रोल वाहनांवर 20 ते 25 हजार रुपये खर्च करतात तर इलेक्ट्रिक वाहनांवर तुम्हाला फक्त दोन हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.


देशात EV निर्माणच्या कामात तेजी आली आहे. सर्व प्रकारच्या उत्पादनात वाढ होत आहे. देशात 400 इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता आहेत. आपल्याकडे 60 किमीच्या रेंजपर्यंत धावतील अशा स्कूटर बनवणाऱ्या कंपनी आहेत, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. तसंच, सरकारदेखील इलेक्ट्रिक कंपन्यांना चालना देण्यासाठी योजना राबवत आहे. ईव्ही कंपन्यांनी ई-वाहनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाणिज्य विभागाने शुक्रवारीच तशी माहिती दिली आहे. 


भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती सुविधा उभारण्याची इच्छा असणाऱ्या परदेशी कंपन्यांसाठी किमान 4,105 कोटी रुपयांची गुंतवणूक हे धोरणात निश्तित करण्यात आले आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे की, एलन मस्कची टेस्लासारख्या प्रमुख ईव्ही कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे येतील.


महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकारः नितीन गडकरी


नितीन गडकरी यांनी मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि आपल्या कामामुळं ते लोकसभा निवडणुकीत चांगला निकाल देतील. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ताकद आमच्यासोबत आहे. त्यामुळं आधीपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील. भाजपा महाराष्ट्र आता आणखी मजबूत झाली आहे.