मुंबई : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायतीचे निकाल लागलेत. मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडलेत. त्यामुळे मनसेच अस्तित्व संपण्यास सुरुवात झालेय, असा दावा करताना कोकणात तेही नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात एका ग्रामपंचायतीवर मनसेने आपला झेंडा फडकलाय. त्यामुळे मनसेच्या विजयाची चर्चा जोरदार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्यात निर्विवाद स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या समर्थ विकास पॅनेलने यश मिळवलेय. सर्वाधिक सरपंच मिळाल्याचा दावा त्यांच्या समर्थ पॅनेलने केलाय. तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी, भाजपचे नेते जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विविध  ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्षाने सावंतवाडी तालुक्यातील कास ग्राम पंचायतीवर दावा केला. 


मनसेने निगुडे ग्राम पंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांनाही पराभव पत्करावा लागला असून काँग्रेसच्या हाती भोपळा आला. निगुडे येथे मनसेचा उमेदवार निवडून आला. मात्र  त्याच्यावर भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. माजगावची प्रतिष्ठेची जागा शिवसेनेने अवघ्या चार मतांनी जिंकली. 


प्रथमच स्वतंत्रपणे निवडणूक लढणाऱ्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना किती जागा मिळतात याचीच उत्सुकता होती. त्यांच्या समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आलेत. राणेंकडे १५६, शिवसेनेकडे  ८४ तर ५१ भाजपकडे ग्राम पंचायती आल्याचा दावा करण्यात आलाय.


महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ कास पॅनेल एक नंबर ठरलाय. ग्रामीण भागात शिवसेना आणि भाजपने मुसंडी मारली आहे. १५६  पेक्षा अधिक ग्राम पंचायतीवर समर्थ विकास पॅनेलने दावा केला असून ८४  ग्राम पंचायतीवर शिवसेना तर ५१ ग्राम पंचायतीवर भाजपने वर्चस्व निर्माण केल्याचा दावा केला आहे. जवळपास ३१ ग्राम पंचायतीमध्ये गाव पॅनेलची सत्ता आली असून तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत.