ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा
राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई : राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस असित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. एकूण ३२५ जागांपैकी सर्वाधिक जागा या माजी मुख्यमंत्री नारायण राणे प्रणित समर्थ विकास पॅनेलने १५३ जागा जिंकल्यात तर शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकावर राहत ७९ जागा पटकावल्यात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे काय चमत्कार करतात याकडे लक्ष लागले होते. तसेच भाजपही स्वतंत्रपणे लढत असल्याने कामगिरीकडे लक्ष होते. भाजपने ४० जागा मिळवत तिसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली. त्यामुळे भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. त्याचवेळी दीपक केसरकर असताना राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले होते. मात्र, त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादीला यश मिळालेले नाही. सावंतवाडीत १ जागेवर केवळ समाधान मानावे लागले. मात्र, ज्या पक्षाची दखल घेण्यात येत नव्हती त्या मनसेने सावंतवाडी एक ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, गावातील राजकारण हे व्यक्तीसापेक्ष राहीले आहे. त्यामुळे गाव पॅनेलला महत्व प्राप्त झालेत. गाव पॅनेलने ४२ जागा पदरात पाडल्यात. तर कुडाळमध्ये युतीला दोन जागा मिळाल्यात. या निवडणुकीत ३ अपक्षांना सरपंचा पदाचा मान मिळालाय.
सावंतवाडीत समर्थ विकास -२४, शिवसेना -११, भाजप -१३, गाव पॅनेल-४, राष्ट्रवादी -१, मनसे-१ , काँग्रेस -०, अशा ५२ जागी सरपंच निवडणून आलेत.
मालवणमध्ये समर्थ विकास -३०, शिवसेना -२२, भाजप -२, गाव पॅनेल-१, राष्ट्रवादी -०, मनसे-०, काँग्रेस -०, अशा ५५ जागी सरपंच निवडणून आलेत.
दोडामार्गमध्ये समर्थ विकास -३, शिवसेना -१३, भाजप -४, गाव पॅनेल-८, राष्ट्रवादी -०, मनसे-०, काँग्रेस -०, अशा २८ जागी सरपंच निवडणून आलेत.
वैभववाडीत समर्थ विकास -१४, शिवसेना -०, भाजप -२, गाव पॅनेल-१, राष्ट्रवादी -०, मनसे-०, काँग्रेस -०, अशा १७ जागी सरपंच निवडणून आलेत.
वेंगुर्लेमध्ये समर्थ विकास -९, शिवसेना -४, भाजप -५, गाव पॅनेल-४, राष्ट्रवादी -०, मनसे-०, काँग्रेस -०, अपक्ष-० अशा २३ जागी सरपंच निवडणून आलेत.
कणकवलीत समर्थ विकास -४६, शिवसेना -२, भाजप -४, गाव पॅनेल-४, राष्ट्रवादी -०, मनसे-०, काँग्रेस -०, अपक्ष-२ अशा ५८ जागी सरपंच निवडणून आलेत.
देवगडात समर्थ विकास -१४, शिवसेना -८, भाजप -९, गाव पॅनेल-६, राष्ट्रवादी -०, मनसे-०, काँग्रेस -०, अपक्ष-० अशा ३८ जागी सरपंच निवडणून आलेत.
कुडाळमध्ये समर्थ विकास -१३, शिवसेना -१९, भाजप -१, गाव पॅनेल-१८, राष्ट्रवादी -०,युती-२, काँग्रेस -०, अपक्ष-१ अशा ५४ जागी सरपंच निवडणून आलेत.