नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat elections) वादातून दोन गटांत समोरासमोर तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली. (Stone-throwing and fighting between the two groups over the dispute at Nanded) नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जाणापुरी येथे ही घटना घडली. जाणापुरी येथे कालही मतदान केंद्रावर वाद झाला होता. पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो वाद मिटला. आज सकाळी 9 च्या सुमारास दोन्ही गटातील काही जन आमनेसामने आले आणि वादास सुरुवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. गवातच वाद झाल्याने दोन्हीकडील महिला आणि मुलानीही वादात उडी घेतली. हाणामारी आणि तुफान दगडफेक दोन्ही बाजूने सुरु झाली. या घटनेत जवळपास 20 जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.


काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हा वाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेनंतर जाणापुरी गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात अद्याप तणावाचे वातावरण आहे.