अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यात २४२ ग्रामपंचायतीपैकी ५१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. राहिलेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचा निकाल पाहता शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. तर राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला जिल्ह्यात फक्त ९ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. 


 राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप यांची जिल्ह्यात आघाडी असली तरी काही ठिकाणी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढलेत. राष्ट्रवादीला ४४ तर शेकापला २४ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणण्यात यश आले आहे. तर काँग्रेस पक्षाला महाड आणि पेण तालुका सोडता इतर तालुक्यात यश संपादन करता आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पिछेहात होताना दिसत आहे.


माणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला संमिश्र यश मिळाले आहे. तालुक्यातील निजामपूर, कुंभे, टोळखुर्द, पळसप या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर नांदवी ग्रामपंचायत विकास आघाडीकडे गेली आहे.


साई ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व १२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय संपादन केला. मुठवली तर्फे तळे ग्रामपंचायत राष्ट्रवादीला आपल्याकडे खेचण्यात यश मिळाले.


गोरेगाव, साई, मुठवली तर्फे तळे, डोंगरोली, भागाड, चिंचवली, या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून करंबेळी, होडगांव, पहेल, मांगरुळ, दहिवली कोंड, न्हावे या ग्रामपंचायती शिवसेनेकडे गेल्या आहेत. 


सरपंच तालुकानिहाय


शिवसेना 


मुरुड ४, पेण ५, पनवेल १, उरण ३, कर्जत ३, खाल‍ापुर ५, माणगाव ७, सुधागड २, महाड २१ (२१ बिनविरोध ), पोलादपुर ११, श्रीवर्धन १, म्हसळा ४   


राष्ट्रवादी  


कर्जत ३, खालापुर ८, माणगाव ६, तळा १, रोहा ४, सुधागड ८, श्रीवर्धन ६, म्हसळा ८ 


काँग्रेस 


महाड २१, अलिबाग १, पोलादपूर ३, पेण ७


शेकाप 


अलिबाग ५, मुरुड १, पेण ९, पनवेल ६, रोहा १, सुधागड २, 


भाजप


पनवेल ४,  उरण १, सुधागड १, महाड २,  पोलादपूर १


इतर सर्व पक्षीय आणि आघाडीचे जवळपास अपक्ष १५ सरपंच निवडणून आलेत.