ग्रामपंचायत निवडणूक : नारायण राणे पास, सदाभाऊ खोत नापास!
ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्तानं सांगलीमध्ये सदाभाऊ खोताची रयत क्रांती संघटना आणि सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची लिटमस टेस्ट झाली.
सांगली : ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्तानं सांगलीमध्ये सदाभाऊ खोताची रयत क्रांती संघटना आणि सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची लिटमस टेस्ट झाली.
या चाचणीमध्ये सदाभाऊ नापास झालेत, तर नारायण राणेंच्या समर्थ विकास पॅनलनं घवघवीत यश मिळवलंय. 151 पैकी 86 ग्रामपंचायतींमध्ये समर्थ पॅनलचा विजय झालाय. शिवसेना 40 तर भाजपा 21 ठिकाणी यशस्वी झालाय. मात्र काँग्रेसमध्ये असताना आख्ख्या जिल्ह्यात राणेंची एकहाती सत्ता होती.
आता शिवसेना आणि भाजपानं त्याला काही प्रमाणात सुरूंग लावलाय. सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे तर सदाभाऊंसह भाजपाला ग्रामीण जनतेनं नाकारलंय.