म्हाताऱ्या आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने विहीरीत उडी घेतली; पण शेवटी....
म्हाताऱ्या आजोबांना(grandfather) वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने(Grandson) मागचा पुढचा कसलाही विचार न करता विहीरीत उडी घेतली. नाशिकमध्ये(Nashik) ही थरारक घटना घडली आहे. नशिब बलवत्तर म्हणून आजोबा आणि नातू दोघेही या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत. आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक देखील होत आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : म्हाताऱ्या आजोबांना(grandfather) वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने(Grandson) मागचा पुढचा कसलाही विचार न करता विहीरीत उडी घेतली. नाशिकमध्ये(Nashik) ही थरारक घटना घडली आहे. नशिब बलवत्तर म्हणून आजोबा आणि नातू दोघेही या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत. आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक देखील होत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात ही घटना घडली आहे. 80 वर्षीय वृद्ध आणि नातू विहिरीत पडल्याची घटना घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
नाठे वस्तीवरील धोंडीराम भालचंद्र नाठे वय वर्षे (80)हे त्यांच्या घराजवळून पायी जात असताना जात शेजारी असलेली विहीर लक्षात न आल्याने ते विहिरीच्या पाण्यात पडले. त्यानंतर धोंडीराम नाठे यांनी मदतीसाठी आरडा ओरड करू लागले, त्यांचा आवाज नातू गणेश गोरख नाठे याना ऐकू आला. आजोबांना वाचविण्यासाठी गणेशने विहिरीत उडी घेतली. परंतु, त्यालाही पोहता येत नव्हते.
दोघांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून स्थानित त्यांच्या मदतीसाठी धावून आले. यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यस्थापन पथक दाखल झाल्यानंतर दोघांनाही सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात आले.